Roshan More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळल्या प्रकरणी एकदा नाही तर शंभर वेळा माफी मागतो असे म्हणाले होते.
पुतळा कोसळल्याप्रकरणी 'सिंधुदुर्गात जे झाले त्यासाठी मान झुकवून शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोके ठेवून माफी मागतो' या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली. असे नरेंद्र मोदी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचा माफीनामा नामंजूर केला. भ्रष्टाचारावर पंतप्रधान काहीच बोलले नाहीत, अशी टीका देखील केली.
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
आज पंतप्रधानांनी महाराजांची माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही. ना त्यावर एकही शब्द काढला.
नरेंद्र मोदींनी माफी मागितली याचाच अर्थ त्यांनी चूक मान्य केली आहे, पण महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता यांना माफ करणार नाही.''
'पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत!
निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली. मुळात पुतळा उभारताना भ्रष्टाचार झाला त्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे.