Vijaykumar Dudhale
बबनराव शिंदे हे विधानसभेवर प्रथम 1995 मध्ये माढा मतदारसंघातून निवडून आले होते.
माढ्यातून अपक्ष निवडून आलेले बबनराव शिंदे यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार पांडुरंग (विनायकराव) पाटील यांचा पराभव केला.
अपक्ष निवडून आलेले बबनदादा शिंदे यांनी 1995 मध्ये युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मंत्रिपदाचा आलेली संधी नाकारून त्यांनी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे काम केले.
बबनराव शिंदे यांनी अशिया खंडातील सर्वांत मोठ्या सीना-भीमा जोड कालव्याचे काम युती सरकार आणि पुढील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात करून घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 मध्ये स्थापना झाल्यानंतर आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
आमदार बबनराव शिंदे हे 1999 पासून सलग पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले.
पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून बबनराव शिंदे यांनी काम करण्याची संधी मिळाली. मात्र, मंत्रिपदाची हुलकावणी मिळत गेली.
साखर कारखानदारीत नावलौकिक मिळविलेल्या बबनराव शिंदे यांनी आता विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला असू शकतो. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे माढ्यातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.