Rajanand More
कथित कोळसा घोटाळ्यात मागील वर्षी २२ जुलैला ईडीकडून अटक. त्याचदिवशी सेवेतून निलंबित. तेव्हापासून तुरुंगातच. सध्या जामिनासाठी प्रयत्न सुरू.
रानू साहू यांच्यासह सौम्या चौरसिया, समीर विश्नोई, एसएस नाग, सूर्यकांत तिवारी यांनाही त्यावेळी अटक. काँग्रेसचे काही नेतेही रडारवर.
तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विश्वासू अधिकारी म्हणून ओळख. साहूंच्या अटकेनंतर ही राजकीयदृष्या प्रेरित कारवाई असल्याची बघेल यांची टीका.
2010 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी. आपल्या कामांमुळे सतत चर्चेत असायच्या. पती जयप्रकाश मोर्य मंत्रालयात सचिव.
छत्तीसगढमधील गरियाबंद जिल्ह्यात जन्म. पोलिस दलात डीएसपी पदावर २००५ मध्ये झाली होती निवड. नंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू. २०१० मध्ये बनल्या आयएएस.
जिल्हाधिकारी तसेच मंत्रालयात अनेक महत्वाची पदे सांभाळली. अटक झाली तेव्हा राज्य कृषी विभागाच्या संचालक होत्या.
कोरबा व रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. हे दोन्ही जिल्हे सर्वाधिक कोळसा उत्पादन होणाऱ्या जिल्ह्यांमधील आहेत.
एका सत्ताधारी आमदाराकडूनच रानू साहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. कथित कोळसा घोटाळा सुमारे 450 कोटींचा.
आपल्या कार्यशैलीमुळे नेहमीच वादात असायच्या. एका मंत्र्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.