Akshay Sabale
ओबीसी आरक्षणासाठी वडीग्रोदी येथील उपोषण मागे घेण्यात आलं आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यात आला. त्या कधीही कोणाच्या विरोधात बोलल्या नाहीत. तरीही काहींनी त्यांना विरोध केला.
जातीय जनगणेला देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा दिला आहे.
विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण पाहिजे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.
आमचा आरक्षण आमच्यात राहुद्या. मराठा समाजाला दुसरं ताट द्या. लोकशाहीत लोकशक्तीचं सर्वात श्रेष्ठ.
राज्यातील अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटण्यात आले. आपल्यावर अन्याय होतोय, अजून किती सहन करणार असे म्हणत हातात हात धरून बसलात तर काहीही होणार नाही
मनोज जरांगेंना आरक्षण म्हणजे काय ते माहिती नाही.