Aslam Shanedivan
भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण (बीआर) गवई यांनी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.
न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल आणि ते या वर्षी नोव्हेंबरमध्ये वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होतील. अद्याप त्यांच्या निवृत्तीला 5 एक महिने बाकी आहेत.
पण आत्तापासून न्यायमूर्ती गवई त्यांच्या निवृत्तीनंतर काय करणार? मोदी सरकार त्यांच्यावर दुसरी काही जबाबदारी देणार? त्यांना खासदार किंवा राज्यपाल बनवलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जाते.
दरम्यान न्यायमूर्ती गवई यांनी आपण निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दारापूर येथे आयोजित सत्कार समारंभात त्यांनी ही घोषणा केलीय.
यावेळी न्यायमूर्ती गवई म्हणाले, मी निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर मला जास्त वेळ मिळेल आणि मी दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये माझा वेळ घालवेन.
गवई यांनी यापूर्वीही निवृत्तीनंतर राजकारणात येणार नाही असे स्पष्ट केले असून एखाद्या व्यक्तीने सरन्यायाधीश पदावर राहिल्यानंतर कोणतीही जबाबदारी, सरकारी पद, निवडणूक लढवू नये, असे म्हटले होते.
यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल बोलताना आपण सोशल मीडिया फॉलो करत नसल्याचे सांगत आपल्याला सामान्य माणसाचे प्रश्न समजून घ्यावे लागतील, असेही म्हटलं आहे.