Ganesh Sonawane
माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
छगन भुजबळ यांना डावलून कोकाटे यांना अजित पवार यांनी कृषीमंत्रीपद दिलं.
परंतु विधीमंडळात मोबाईलवर पत्ते खेळताना व्हिडिओ समोर आल्याने कोकाटे हे वादात सापडले आहेत.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद आणि त्यातही कृषी खात्यासारखे महत्त्वाचे मंत्रिपद कसे मिळाले याचा प्रश्न पडतो.
त्याचे उत्तर त्यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यात दडलेले असल्याचे बोलले जाते.
प्रचार सभेत त्यांनी, “माझा मतदारसंघ अजित पवार यांना सोपवतो आणि त्यांना निवडून आणतो,” असे विधान केले होते.
हे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोकाटेंवरील विश्वास वाढला आणि त्यातूनच त्यांना मंत्रिपद मिळाले, अशी चर्चा आहे.
कृषिमंत्री झाल्यानंतर कोकाटे यांनी अनेक चांगल्या निर्णयांची सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमधील चुका आणि भाषेतील त्रुटी यावर विरोधक सतत बोट ठेवताना दिसतात.