Rashmi Mane
सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी क्षणात त्याला पकडून बाहेर काढले. पण तुम्हाला माहीत आहे का? कोण करते CJI ची सुरक्षा?
देशातील सर्वोच्च न्यायिक पदावर असणाऱ्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाला Z+ कॅटेगरीची सुरक्षा दिली जाते. ही भारतातील सर्वाधिक कडक सुरक्षा पातळी मानली जाते.
Z+ कॅटेगरीमध्ये साधारण 35 ते 55 कमांडो आणि जवान तैनात असतात. यात एनएसजी, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचे जवान असतात.
CJI च्या सुरक्षेत बुलेटप्रूफ वाहनं, पायलट कार आणि एस्कॉर्ट गाड्यांचा मोठा ताफा असतो. त्यामुळे आजूबाजूला होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर कडक नजर असते.
सुप्रीम कोर्टात सुरक्षा अनेक स्तरांमध्ये विभागलेली असते. त्यामध्ये बाहेरील गेट, परिसर, आणि कोर्ट रूममध्ये वेगवेगळे जवान तैनात असतात.
कोणताही धोका दिसताच कमांडो क्षणात सीजेआयला सुरक्षित स्थळी हलवतात. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिलेले असते.
सुप्रीम कोर्ट परिसरात एकूण 700 हून अधिक जवान सतत ड्युटीवर असतात. यामध्ये दिल्ली पोलिस, सीआयएसएफ आणि सीआरपीएफचे जवान यांचा समावेश असतो.
कोर्ट रूममध्ये प्रेक्षक गॅलरीपासून जजच्या खुर्चीपर्यंत प्रत्येक स्तरावर सशस्त्र सुरक्षा असते. प्रत्येक हालचाल सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाते.