Rashmi Mane
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात आलीय.
यावेळी कुटुंबीयासोबत उपमुख्यमंत्र्यांनी गणराजयांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतलं.
सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, असं साकडंही देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडं घातलंय.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या आई, पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजासह इतर कुटुंबीय उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या बाप्पाच्या आगमनाचे आणि प्राणप्रतिष्ठापणेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठापना केली. आज माझ्या मुंबई येथील निवासस्थानी बाप्पांचे आगमन झाले असं फडणवीसांनी ट्वीट केलं.