Eknath Shinde : होय होय वारकरी...पाहे पाहे रे पंढरी!

Vijaykumar Dudhale

बुलेटवरून पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेटवर बसून आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या बुलेटचे सारथ्य पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी केले.

Eknath Shinde | Sarkarnama

पंढरपूर शहरातून फेरफटका

८) बुलेटवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर शहरातून फेरफटका मारत वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.

Eknath Shinde | Sarkarnama

व्हीआयपी दर्शन

वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा निर्णय विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाबाबत सरकार घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

Eknath Shinde | Sarkarnama

आरोग्य शिबिराची पाहणी

आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यांना औषधे तसेच पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत अथवा नाही, याचा आढावा घेतला.

Eknath Shinde | Sarkarnama

मोफत अन्नदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उद्यापासून (ता. 16 जुलैपासून) तीन दिवस मोफत अन्नदान केले जाणार आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

65 एकर परिसराला भेट

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर 65 एकर परिसरात वारकऱ्यांसाठी उभारलेल्या विविध सोयी सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात स्वच्छतागृह, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता तसेच शहरातील स्वच्छतेबाबत पाहणी केली.

Eknath Shinde | Sarkarnama

चंद्रभागेचे तीर्थ मस्तकी लावले

एकनाथ शिंदे यांनी चंद्रभागा नदीचे दर्शन घेतले. त्यानंतर नदीपात्रात उतरून पाय धुतले आणि पवित्र चंद्रभागेचे तीर्थ आपल्या मस्तकी लावले. त्याच वेळी त्यांनी चंद्रभागा स्वच्छ्तेबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.

Eknath Shinde | Sarkarnama

दर्शनरांगेतील वारकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी दर्शनरांगेतील वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

Eknath Shinde | Sarkarnama

ट्रम्पच नाही तर 'या 'राष्ट्राध्यक्षांवरही झाला होता हल्ला

Donald Trump | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा