Sunil Balasaheb Dhumal
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.
पेन्सिल्वेनियातील प्रचार रॅलीत झालेल्या गोळीबारातून ते बालंबाल बचावले.
हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली.
ट्रम्प यांच्या हत्येचा हल्लेखोराचा कट असल्याचे आता उघड झाले आहे.
ट्रम्प यांच्यावर थॉमस मॅथ्यू क्रुक्स या 20 वर्षीय हल्लेखोराने एका इमारतीवरून स्नायपरने दहा गोळ्या झाडली.
गोळीबारानंतर यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या स्नायपरने हल्लेखोराला कंठस्नान घातले.
या हल्ल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी हाताची वज्रमूठ करून विजयाचा निर्धार केला आहे.
या हल्ल्यात एका समर्थकाचा मृत्यू झाल्याने ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केले.