Roshan More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारकरी संतपूजन तथा शांतीब्रह्म व तुलसीदास पुरस्कार प्रदान सोहळासाठी रविवारी (ता.8) आळंदीत उपस्थित होते.
आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतले.
संस्थान समितीच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत नतमस्तक झाले.
मुख्यमंत्री शिंदे यांचे चिमुकलीने श्रीफळ देत स्वागत केले.
वारकरी संप्रदायात अत्यंत मानाचे समजले जाणारे 'तुलसीदास पुरस्कार' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
ह.भ.प.मारुती महाराज कुरेकर यांना ९३ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांना ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला