Vijaykumar Dudhale
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळीच लालबागचा राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले.
उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीत प्रथमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहेत
उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले
ठाकरे कुटुंबीयांनी प्रथम लालबागच्या राजाची विधीवत पूजा केली, त्यानंतर आरती केली.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अशी शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंची ओळख सांगितली जाते.
लालबागमधील चिंचपोकळीच्या चिंतामणी गणरायाचेही उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी दर्शन घेतले.
लालबाग गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ह्यांनी दर्शन घेतले. मुंबईच्या राजाकडे ठाकरेंनी महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली.
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते (स्व.) मनोहर जोशी ह्यांच्या घरच्या गणरायाचेही उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही होते.