Nitish Kumar Resign : नितीशकुमार भाजपच्या प्रेमात 'तेजस्वी'सोबत घटस्फोट; असा आहे घटनाक्रम

Roshan More

18 महिन्यांत कोलांटउडी

2022 मध्ये भाजपा आणि जनता दल (युनायटेड) ची युती तुटली. राजदच्या पाठिंब्याने नितीशकुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. मात्र, अवघ्या 18 महिन्यात नितीशकुमार यांनी तेजस्वी यांची साथ सोडली.

Nitish Kumar Resign | srkarnama

लालूंचा दबाव

तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्याकडून नितीशकुमार यांच्यावर दबाव येत होता.

Nitish Kumar , lalu yadav | sarkarnama

'इंडिया'चे समन्वयक पद मिळाले नाही

इंडिया आघाडी स्थापन करण्यात नितीशकुमार आघाडीवर होते. मात्र, त्यांना या आघाडीचे समन्वयक पद मिळाले नाही म्हणून ते नाराज असल्याची चर्चा होती.

Nitish Kumar | sarkarnama

भाजपचा ‘कर्पूरी’ इफेक्ट

समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षात मोदी सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न'दिल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे नितीशकुमार यांना योग्य तो संदेश दिला गेला.

karpuri thakur | srkarnama

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी (ता.28) आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र आरर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला.

Nitish Kumar | sarkarnama

राजीनामा का दिला...

महागठबंधन सरकारमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आमच्या पक्षातील नेते आपण सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असे सांगत होते, त्यामुळे राजीनामा दिला असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.

Nitish Kumar | sarkarnama

पलटूकुमार

राजकारणात सर्वाधिक कोलांटउड्या मारणारे ‘पलटूकुमार’ म्हणून नितीशकुमार यांच्यावर टीका केली जाते.

Nitish Kumar | srkarnama

पुन्हा मुख्यमंत्री होणार

नितीशकुमार भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

NEXT : छगन भुजबळांची पक्षांतर्गत कोंडी?

Chhagan Bhujbal | sarkarnama
येथे क्लिक करा