Savitri Jindal : देशातील सर्वात श्रीमंत महिलेचे भाजप विरोधात बंड; अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

Rashmi Mane

भाजपमध्ये मोठा भूकंप

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजपमध्ये मोठा भूकंप झाला आहे.  

Savitri Jindal | Sarkarnama

नेत्यांच्या नाराजी

यादी जाहीर होताच अनेकांनी भाजपला रामराम ठोकला असून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादीवरून पक्षात विरोध सुरू झाला. हरियाणात भाजपला नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे.

Savitri Jindal | Sarkarnama

पक्षाला रामराम

अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामे देत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यातच आता काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

Savitri Jindal | Sarkarnama

सावित्री जिंदाल

देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचाही समावेश आहे.

Savitri Jindal | Sarkarnama

अपक्ष उमेदवारी

निवडणुकीआधी ७४ वर्षीय सावित्री जिंदाल यांनी भाजप विरोधात बंड करून हरियाणाच्या हिस्सार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Savitri Jindal | Sarkarnama

हिसारमधून दोन वेळा आमदार

याआधी सावित्री जिंदाल हिसारमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2005 मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. यानंतर 2009 मध्ये त्या निवडून आल्या. 2013 मध्ये त्या हरियाणाच्या हुडा सरकारमध्ये मंत्री झाल्या होत्या.

Savitri Jindal | Sarkarnama

मतदारसंघ

सावित्री जिंदाल यांचे दिवंगत पती ओपी जिंदाल हिसार मतदारसंघातून आमदार होते. ते हरियाणा सरकारमध्ये मंत्रीही होते.

Savitri Jindal | Sarkarnama

Next : विकास पथ पर हम..., म्हणत कोस्टल रोडवरून CM शिंदे अन् फडणवीसांची सफर, पाहा PHOTOS

येथे क्लिक करा