CM Who Became PM: मोदींप्रमाणेच PM होण्यापूर्वी हे नेते होते CM

Mangesh Mahale

मोरारजी देसाई

मोरारजी देसाई हे पंतप्रधानपदाची शपथ घेणारे पहिले मुख्यमंत्री होते. १९७७ ते १९७९ या काळात पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्यापूर्वी १९५१ ते १९५६ या काळात मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्रीही होते.

CM Who Became PM news | Sarkarnama

चौधरी चरण सिंह

चौधरी चरण सिंह हे उत्तर प्रदेशचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९६७ ते १९६८ आणि दुसऱ्यांदा १९७० ते ऑक्टोबर १९७० या काळात ते मुख्यमंत्री होते. १९७९ ते १९८० या काळात ते पंतप्रधान होते.

CM Who Became PM news | Sarkarnama

व्हीपी सिंग

१९८० मध्ये व्हीपी सिंग यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आणि १९८२ पर्यंत हे पद सांभाळले. १९८९ ते १९९० या काळात ते पंतप्रधान होते.

CM Who Became PM news | Sarkarnama

पीव्ही नरसिंह राव

पीव्ही नरसिंह राव 1971 ते 1973 दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९१ ते १९९६ या काळात ते पंतप्रधानही होते.

CM Who Became PM news | Sarkarnama

एचडी देवेगौडा

एचडी देवेगौडा १९९६ ते १९९७ या काळात पंतप्रधान होते. १९९४ ते १९९६ या काळात त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीही होते.

CM Who Became PM news | Sarkarnama

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनीही देशाची सत्ता हाती घेण्यापूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळली.

CM Who Became PM news | Sarkarnama

गुजरातचे मुख्यमंत्री

मोदी सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २००१ ते २०१४ पर्यंत ते सलग गुजरातचे मुख्यमंत्री होते.2014 मध्ये मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

CM Who Became PM news | Sarkarnama

तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता...

'अबकी बार ४०० पार'चा नारा देत बीजेपी मैदानात उतरली आहे. बीजेपीला सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवायची आहे.

CM Who Became PM news | Sarkarnama

नेहरुनंतर पंतप्रधान होणारे मोदी...

बीजेपीने ही निवडणूक जिंकली तर नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तीन वेळा पंतप्रधान होणारे दुसरे नेते ठरतील.

CM Who Became PM news | Sarkarnama

NEXT: भाजपच्या नेत्या, दोन वेळा खासदार पूनम महाजन यांचा यंदा पत्ता कट