सरकारनामा ब्यूरो
कीर्थना या दक्षिण भारतातील एक लोकप्रिय बालकलाकार होत्या
अभिनय क्षेत्रात महत्त्वाच्या भुमिका निभावल्या. परंतु जसजशा त्या मोठ्या होत गेल्या तसा त्यांचा कल यूपीएससीकडे वळला.
अधिकारी होण्यासाठी कीर्थना यांनी अभिनय क्षेत्राला बाय-बाय केला अन् आयएएसचे स्वप्न पूर्ण केले.
सुरुवातीला त्यांनी कर्नाटक प्रशासकीय सेवा (KAS) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
केरळ प्रशासकीय सेवेत त्यांनी दोन वर्षे अधिकारी पदावर काम केले होते.
UPSC करण्याचा निर्णय घेतला, त्यात पाच वेळा अपयशी होऊनही जिद्द न सोडता त्या प्रयत्न करत राहिल्या.
सहाव्या प्रयत्नात 167 वी रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली अन् IAS होऊन त्या कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात रुजू झाल्या.
आधी बालकलाकार नंतर KAS मध्ये अधिकारी आणि शेवटी IAS होण्यापर्यंत त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिले.
कीर्थना यांचा हा प्रवास जिद्द आणि चिकाटीचे उदाहरण देतो.