Aslam Shanedivan
अमेरिकेने अलिकडेच एच-1बी व्हिसासाठी शुल्क वाढवले आहे, ज्यामुळे या व्हिसा मिळवणे कठीण झाले आहे.
यामुळे भारतासह जगभरातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. तर सगळ्यात महत्वाचे अमेरिकेत जावून काम करू पाहणाऱ्या तरूणांचे स्वप्न भंग झाले आहे
यावर आता अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीनने 1 ऑक्टोबरपासून K-व्हिसा योजना सुरू केली आहे.
चीनने संधी साधत STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) मधील जागतिक प्रतिभांना आकर्षित करण्यासाठी नवीन 'K व्हिसा' घोषित केली आहे.
ही योजना मुख्यतः कुशल कामगारांना चीनमध्ये काम करण्याची परवानगी देण्यासाठी सुरू करण्यात आली असून एच-1बी व्हिसाला पर्याय असणार आहे.
K व्हिसामुळे तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात चीन बळकट होईल सोबतच परदेशी व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल.
चीनच्या 12 व्हिसा प्रकारांमध्ये K हा सर्वाधिक महत्वाचा असणार असून बहुप्रवेश, सर्वाधिक मुदत वैधता आणि विस्तारित असणार आहे.
याअंतर्गत चीनमध्ये शैक्षणिक, संस्कृती देवाणघेवाणीसह स्वतंत्र व्यवसाय करता येईल. यामुळे चीन अमेरिका, युरोपसारख्या देशांशी स्पर्धेत पुढे असेल. तर दक्षिण आशियाई प्रतिभांना चीनमध्ये पर्याय उपलब्ध होईल.