सरकारनामा ब्यूरो
महागड्या कोचिंग क्लास शिवाय जिद्द, चिकाटीच्या जोरावर स्वप्नाला गवसणी घालणाऱ्या बिहारच्या चित्रा कुमारी यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ..
अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चित्रा कुमारीने आर्थिक अडचणींचा सामना करत जिद्दीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात (बिहार लोकसेवा आयोग) परीक्षेत यश मिळवले.
2008 मध्ये चित्राचे वडील सुरेश प्रसाद यांची नोकरी गेली. अचानक आलेल्या आर्थिक संकटामुळे कुटुंब अडचणीत आले. परंतू चित्रा यांनी जिद्द सोडली नाही.
वडीलांची नोकरी गेली, शिक्षण घेताना आर्थिक विवंचना, असंख्य अडचणींचा सामना केला, परंतु चित्रा यांनी हार मानली नाही. अखेर चित्रा कुमारी DSP झाल्या.
वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, घर गहाण ठेवले आणि मिळालेले पैसे बँकेत ठेवून व्याजातून शिक्षणाचा खर्च भागवला.
कोचिंगसाठी पैसे नव्हते.. होती ती फक्त जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, आणि कुटूंबाची साथ.
पहील्याच प्रयत्नात कोचिंगशिवाय 67 वी रँक मिळवत DSP अधिकारी होण्याच्या स्वप्नाला गवसणी घातली.
20 व्या वर्षी DSP झालेल्या चित्रा कुमारी आज अनेक तरूणांसाठी प्रेरणा आहेत.
आमदार-खासदारांशी कसं वागावं? फडणवीसांकडून अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे