Deepak Kulkarni
दक्षिण सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता विजय थलपती याने आपली नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे.
दक्षिण भारतात अभिनेत्यानं राजकारणात एन्ट्री घेणं हे काही नवीन नाही. तिकडे ती परंपराच समजली जाते.
त्याने स्वत:चा ‘तमिझागा वेत्री कषगम’ मराठीतला ‘तामिळनाडू विजय पार्टी’ या नावाचा पक्षही काढला आहे.
तामिळनाडूत 2026 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यात विजयचा पक्ष उतरण्याची दाट शक्यता आहे. त्याने लोकसभेला कोणत्याही पक्ष, आघाडी किंवा युतीला आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला नव्हता.
सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. त्यात अनेक सेलिब्रिटी धर्माचं पालन करत रोजाचा उपवास करतात. आता साऊथचा सुपरस्टार थलपती विजयनेही हा उपवास ठेवला होता.
थलपती विजयने शुक्रवारी(ता.7 मार्च) चेन्नई येथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तार पार्टीत जवळपास 15 मस्जिदमधील मुस्लिम बांधवांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
इफ्तार पार्टीसाठी येणाऱ्या 3 हजार लोकांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडिओ समोर विजयनेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
अभिनेता विजयच्या पक्षाकडून ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत त्याने पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्याचं दिसून येत आहे. त्याबरोबरच मुस्लिम बांधवांची टोपीही घातल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी अभिनेता थलपती विजयने उपस्थित मुस्लिम बांधवांसोबत नमाज पठण करत रोजाचा उपवास सोडला. 'जन नायकन' या सिनेमातून लवकरच विजय प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.