Jagdish Patil
भारतात असं एक राज्य आहे जिथे आतापर्यंत फक्त दोनच महिला मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचल्या असून त्या दोघीही अभिनेत्री आहेत.
त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि राजकारणी होत्या. शीला दीक्षित यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
त्या महिला नेत्याचं नाव आहे जयललिता, त्या 14 वर्षे 124 दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या.
याच राज्यात आणखी एका महिला मुख्यमंत्री झाल्या, ज्यांचा कार्यकाळ केवळ 23 दिवसांचा होता.
महत्वाची बाब म्हणजे जयललितांप्रमाणे त्याही अभिनेत्री होत्या. त्यांचं नाव आहे व्ही.एन जानकी रामचंद्रन.
त्या 7 जानेवारी 1988 ते 30 जानेवारी 1988 या काळात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या.
तर या दोघीही ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या महिला नेत्या होत्या.
व्ही. एन जानकी या लोकप्रिय अभिनेते आणि राजकारणी एम. जी रामचंद्रन यांच्या पत्नी होत्या.
पतीच्या निधनानंतर त्यांनी 23 दिवस मुख्यमंत्रिपदाची कारभार सांभाळला होता. तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अभिनेत्री मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.