Indian citizenship proof : आधार अन् पासपोर्टनेही नागरिकत्व सिद्ध होईना; मग 'हा' एकच कागद ठरणार गेमचेंजर?

Rashmi Mane

आधार, पासपोर्ट अन् वोटर कार्डही अपुरे?

भारतात नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र वापरले जात असले तरी कायद्याच्या दृष्टीने हे कोणतेही दस्तऐवज नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानले जात नाहीत. त्यामुळे नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारची स्पष्ट भूमिका

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पासपोर्ट हा नागरिकत्वाचा कायदेशीर पुरावा नाही. पासपोर्ट मिळवण्यासाठी पडताळणी होत असली तरी काही विशेष परिस्थितींमध्ये गैर-नागरिकांनाही पासपोर्ट दिला जाऊ शकतो.

आधार कार्ड नागरिकत्व सिद्ध करत नाही

आधार कार्ड हे केवळ ओळख आणि निवासाचा पुरावा आहे. सर्वोच्च न्यायालय आणि यूआयडीएआयने अनेकदा स्पष्ट केले आहे की आधारधारक भारतीय नागरिकच असेल, याची कोणतीही हमी नसते.

पॅन कार्डचा नागरिकत्वाशी संबंध नाही

पॅन कार्ड हे कर आणि आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाणारे दस्तऐवज आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असले तरी त्यावरून त्याचे भारतीय नागरिकत्व सिद्ध होत नाही.

वोटर आयडी किती महत्त्वाचा?

मतदार ओळखपत्रामुळे व्यक्तीचे नाव मतदार यादीत असल्याचे दिसते. मात्र मतदार यादी वेळोवेळी अद्ययावत केली जाते. त्यामुळे फक्त वोटर कार्ड असणे म्हणजे नागरिकत्वाचा अंतिम पुरावा ठरत नाही.

मग नागरिकत्व ठरते कशावर?

नागरिकत्व ही केवळ ओळख नसून एक कायदेशीर स्थिती आहे. जन्म, पालकांची नागरिकत्व स्थिती आणि विविध सरकारी नोंदी यांच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व निश्चित केले जाते.

'हा' कागद ठरू शकतो गेमचेंजर!

जन्म दाखला, पालकांच्या नोंदी, नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा सरकारकडून दिलेले संबंधित कायदेशीर दस्तऐवज हे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पुरावे मानले जातात. अनेक प्रकरणांमध्ये जन्म दाखला निर्णायक भूमिका बजावू शकतो.

भारतात एकच नागरिकत्व कार्ड नाही!

भारतात अद्याप सर्वांसाठी एकसमान नागरिकत्व कार्ड अस्तित्वात नाही. जन्म, वंश, नोंदणी, नैसर्गिकीकरण किंवा भूभागाच्या समावेशाद्वारे नागरिकत्व मिळते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व वेगवेगळ्या कागदपत्रांवर आधारित सिद्ध केले जाते.

Next : नुसतं 'फाशी द्या' न म्हणता 'मरेपर्यंत फाशी' अशी तरतूद कायद्यात का करण्यात आली? जाणून घ्या

येथे क्लिक करा