नुसतं 'फाशी द्या' न म्हणता 'मरेपर्यंत फाशी' अशी तरतूद कायद्यात का करण्यात आली? जाणून घ्या

Ganesh Sonawane

मरेपर्यंत फाशी

नसरापूरच्या घटनेतील नराधम भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Death Penalty | Sarkarnama

काय आहे इतिहास

पण नुसतं 'फाशी द्या' असं न म्हणता, 'मरेपर्यंत' हा शब्द जोडण्यामागचं मुख्य कारण काय? जाणून घेऊ

Sarkarnama

दोरी तुटायची

ब्रिटीश किंवा जुन्या काळात जेव्हा गुन्हेगाराला फाशी दिली जायची, तेव्हा काही वेळा अपघाताने किंवा तांत्रिक कारणामुळे फाशीची दोरी तुटायची किंवा फासावर लटकवल्यानंतरही गुन्हेगाराचा जीव वाचायचा तो मरत नव्हता.

Death Penalty, | Sarkarnama

प्रक्रिया पूर्ण

अशावेळी गुन्हेगाराचे वकील कोर्टात असा युक्तिवाद करायचे की, 'कोर्टाने फक्त फाशी देण्याची शिक्षा दिली होती, ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Bombay High Court

चमत्कार

आता माझा अशील (क्लायंट) वाचला हा देवाचा चमत्कार आहे, त्यामुळे त्याला पुन्हा फासावर चढवता येणार नाही असा युक्तिवाद वकिल करत.

Death Penalty Law | Sarkarnama

कायद्यात बदल

कायद्यातील याच पळवाटेचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगार वाचायचे आणि हीच कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला.

Death Penalty Law | Sarkarnama

मरेपर्यंत फाशी

CRPC च्या कलम ३५४ (५) नुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा दिली जाते, तेव्हा आदेशात स्पष्ट लिहावं लागतं की, त्या व्यक्तीला मानेला फाशी देऊन तो मृत होईपर्यंत लटकवून ठेवण्यात यावे.

Death Penalty Law | Sarkarnama

फाशी

कारण हा न्यायालयाचा अंतिम आदेश असतो ज्यामध्ये कोणत्याही चमत्काराला जागा उरत नाही. तो मरत नाही तोपर्यंत त्याला फाशी दिली जाते.

Death Penalty Law | Sarkarnama

NEXT : मृत्युदंड व जन्मठेप यातील नेमका फरक काय? घ्या जाणून..

येथे क्लिक करा