सरकारनामा ब्यूरो
1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रवेश शर्मा यांनी 2016 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. 'भाजीवाला' नावाने छोटासा व्यवसाय सुरू करत स्टार्टअपद्वारे ते फळे आणि भाज्या विकत आहेत.
डॉ. सय्यद सबाहत अजीम हे 2000 बॅचचे अधिकारी आहेत. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी हेल्थकेअर क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. आज ते कोट्यवधींचे मालक आहेत.
राजन सिंह यांनी 8 वर्षे पोलिस दलात सेवा बजावल्यानंतर राजीनामा दिला. 2016 मध्ये ConceptOwl हा ऑनलाइन कोचिंग क्लास त्यांनी सुरू केला.
22 वर्षांत त्यांनी कर्नाटक सरकारचे आयटी आणि जैवतंत्रज्ञान सचिव म्हणूनही काम केले. राजीनामा देऊन 2005 मध्ये त्यांनी ब्रिकवर्ड इंडिया फर्मची स्थापना केली.
मणिपूर केडरचे माजी आयएएस चंद्रशेखर यांनी जेमतेम 6 वर्षे नोकरी करून राजीनामा दिला. भावासोबत बायोमेडिकल उपकरणे बनवणारी कंपनी सुरू केली.
संजय गुप्ता यांनी 2002 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर अदानी ग्रुपचे सीईओ म्हणून काम केले, मग त्यांनी 'चेन कॉम्बो' नावाचे लक्झरी हॉटेल सुरू केले.
मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव हे 1956 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर राहिले आहेत. राजीनामा दिल्यानंतर मारुती सुझुकीसोबत त्यांनी आपला प्रवास सुरू केला.
14 वर्षांच्या नोकरीनंतर रोहित मोदी हे नोकरीचा राजीनामा देत खासगी क्षेत्राकडे वळले. मोठ्या कंपन्या आणि प्रकल्पांचे नेतृत्व करणाऱ्या टॉप सीईओंमध्ये त्यांची ओळख आहे.
नोकरीनंतर त्यांनी अगदी कमी शुल्कात चालणारी 'लर्निंग स्पेस एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी सुरू केली.
R