बोगस मतदान रोखण्यासाठी खुद्द सरन्यायाधीशांनीच सुचवला रामबाण उपाय

Rajanand More

बोगस मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो की विधानसभा-लोकसभेची, प्रत्येक निवडणुकीत बोगस मतदानाच्या तक्रारी समोर येतात. माझ्या नावावर इतर कुणीतरी मतदान केल्याच्या तक्रारी मतदार करतात.

Voting | Sarkarnama

जनहित याचिका

ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांनी बोगस मतदानाबाबत सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर कोर्टाने सोमवारी (१३ एप्रिल) केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली.

Supreme Court | Sarkarnama

सरन्यायाधीश

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीशांनी महत्वपूर् निरीक्षणे नोंदविली.

CJI Surya Kant | Sarkarnama

बायोमेट्रिक ओळख

कोर्टाने बोगस मतदान टाळण्यासाठी उपाय सुचविला आहे. मतदानाआधी मतदाराची ओळख बायोमेट्रिक पध्दतीने किंवा चेहऱ्याचे स्कॅनिंग च्या माध्यमातून केली जाऊ शकते.

Voting | Sarkarnama

गंभीर प्रस्ताव

सरन्यायाधीशांनी हा प्रस्ताव गंभीर असल्याचे सांगत निवडणुकी प्रक्रियेतील शुध्दतेसाठी त्यावर विचार करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Voting | Sarkarnama

रात्रीत बदलणार नाही

निवडणूक प्रक्रिया एका रात्रीत बदलता येणार नाही. त्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करावे लागतील. त्यासाठीचे बजेटही खूप मोठे असेही सरन्यायाधीश म्हणाले.

Voting | Sarkarnama

बोगस मतदान अशक्य

चेहऱ्याचे स्कॅनिंग व अंगठ्याच्या ठश्याद्वारे मतदाराची ओळख पटविल्यास बोगस मतदान करणे अशक्य होईल. अधिकृत मतदाराशिवाय त्याच्या नावावर इतर कुणीच मतदान करू शकणार नाही.

Voting | Sarkarnama

पारदर्शकता

ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. या उपायोजनेमुळे मतदारांच्या मतदानाचे डिजिटल आणि रिअल टाईम ऑडिटही शक्य होईल.

Voting | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप; काँग्रेसचा बडा नेता गायब...

येथे क्लिक करा.