CJP Funding : कॉक्रोच जनता पार्टीला पैसा कुठून मिळतोय? मुख्य प्रवक्ते सौरव दास यांचं खास उत्तर

Pradeep Pendhare

सीजेपीचं पहिलं आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टी 6 जूनला नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत आंदोलनाचा घोषणा केली आहे.

CJP Funding | Sarkarnama

सीजेपीला फंडिंग

सीजेपीला आंदोलन सुरू ठेवण्यासाठी फंडिंगची आवश्यक असल्याने, फंडिंग कसे उपलब्ध होणार, हा प्रश्न विचारला जात आहे.

CJP Funding | Sarkarnama

सत्ताधाऱ्यांना आव्हान

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी पक्षाच्या फंडिंग संदर्भातील प्रश्नाचं खणखणीत उत्तर देत, सत्ताधाऱ्यांना तरुणाची ताकद दाखवली आहे.

CJP Funding | Sarkarnama

सौरव दास यांचा प्रतिप्रश्न

सौरव दास यांना सीजेपीच्या फंडिंगबद्दल, "फंडिंग कशासाठी हवं आहे?", पोस्टरसाठी सर्वांनी एक-एक रुपया दिला, तर 200 रुपयांचं पोस्टर तयार होणार नाही का? असा प्रतिप्रश्न केला.

CJP Funding | Sarkarnama

CJP Fundingफंडिंग कशाला हवं

तरुणांनी रस्त्यावर उतरायचं आहे, जंतर-मंतर पोहोचायचं आहे, तर ऑटोरिक्षावर 100 रुपये खर्च करू शकत नाही का? त्यासाठी फंडिंग कशाला हवं? असंही सौरव दास यांनी म्हटलं.

CJP Funding | Sarkarnama

काउंटर नरेटिव्ह

कोणतंही आंदोलन असो, जेव्हा एक चांगलं आंदोलन होतं, तेव्हा त्याच्याविरोधात एक काउंटर नरेटिव्ह चालवलं जातं, याची साक्ष इतिहास देतो, असेही सौरव दास यांनी म्हटलं.

CJP Funding | Sarkarnama

कहाण्या मांडल्या जातात

कॉन्स्पिरसी थिअरी चालवली जाते. फंडिंगचा मुद्दा आणला जातो, परकीय शक्तीचा मुद्दा आणला जातो, अशा अनेक कहाण्या मांडल्या जातात, असंही सौरव दास यांनी स्पष्ट केलं.

CJP Funding | Sarkarnama

आंदोलन योग्य दिशेनं

आमच्या दृष्टीनं या गोष्टीची एकप्रकारे खातरजमा झाली आहे की हे आंदोलन योग्य दिशेनं पुढे जात आहे. त्यामुळेच अशा कहाण्या मांडल्या जात आहेत, असं ते म्हणाले.

CJP Funding | Sarkarnama

अभिजीत भारतात येणार

'कॉक्रोच जनता पार्टी' या सोशल मीडिया मोहिमेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी भारतात परत येऊन शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

CJP Funding | Sarkarnama

NEXT : जागतिक तेल बाजारात अत्यंत भयानक परिस्थिती

येथे क्लिक करा :