Pradeep Pendhare
मिडिल ईस्टमधील वाढता तणाव आणि इराणयुद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेला 'होर्मुज स्ट्रेट' बंद असल्यामुळे जागतिक बाजारपेठेतून दररोज 1.2 ते 1.3 कोटी बॅरल तेलाचा पुरवठा गायब झाला आहे.
अमेरिका आणि इराणमधील संभाव्य करारामुळे तेल बाजारात तात्पुरती शांतता दिसत असली, तरी जागतिक तेल साठा अत्यंत वेगाने तळाला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 150 ते 160डॉलरच्या पार जातील आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटली जाईल, असा इशारा तेल क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी दिला आहे.
2026च्या सुरवातीला जागतिक तेल साठा 8.4 अब्ज बॅरल होता. परंतु त्यापैकी केवळ 0.8 अब्ज बॅरल तेलच प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होते.
होर्मुज स्ट्रेट असाच बंद राहिला, तर सप्टेंबर 2026पर्यंत जगातील तेल साठा अशा धोकादायक पातळीवर पोहोचणार असल्याचा इशारा आहे.
मे 2026 महिन्यात जागतिक तेल साठा विक्रमी 87 लाख बॅरल प्रतिदिनाच्या दराने घटला आहे.
सुलतान अल-जाबेर यांनी, होर्मुज स्ट्रेटमधून तेलाची वाहतूक पूर्ववत होण्यास किमान चार महिने लागतील, तर पूर्ण क्षमतेने तेल प्रवाहसाठी 2027च्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीची वाट पाहावी लागेल.