Deepak Kulkarni
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं असून मोदी सरकारनं अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. तसेच उर्वरित दोन मागण्याही मान्य केल्या. यानंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं.
अवघ्या सव्वा दोन महिन्यांपूर्वी सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यानंतर बेरोजगार तरुणांच्या संतापातून छत्रपती संभाजीनगरचे अभिजित दीपके यांनी 'Cockroach Janta Party'ची स्थापना केली होती.
ज्यांनी मोदी सरकारला आपल्या 'डिजिटल क्रांती'तून झुकवलं, त्या अभिजीत दीपके यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी आपण जाणून घेऊयात. ते मूळचे छत्रपती संभाजीनगरचे असून उच्चशिक्षित आहेत.
दीपके यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात पत्रकारितेचेही धडेही गिरवले आहेत .
पत्रकारितेची पदवी मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दिपके अमेरिकेला गेले. त्यांनी तेथे नामांकित बोस्टन युनिव्हर्सिटीमधून Public Relations या विषयात मास्टर्स पूर्ण केलं आहे.
अभिजीतने यापूर्वी 2020-2023 काळात आपच्या सोशल मीडिया टीममध्ये प्रमुख स्वयंसेवक आणि डिजिटल रणनीतीकार म्हणून महत्त्वपूर्ण काम केले होते.
तसेच दिपके यांच्या राजकीय मिम्स बेस डिजिटल मोहिमेचा 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील 'आप'च्या दणदणीत विजयामागे मोठा वाटा होता.
अभिजीत दिपके यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय (CMO) आणि शिक्षण विभागाचे माध्यम सल्लागार म्हणूनही काम पाहिलं आहे.
30 वर्षीय अभिजित दीपके यांच्या 'Cockroach Janta Party' (CJP) या डिजिटल चळवळीनं इतिहास रचला. इन्स्टाग्रामवर अवघ्या चार दिवसांत 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले होते. भाजप काँग्रेसच्या पेजला मागे टाकले होते.
आता दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीनं मोदी सरकारला घाम फोडला. पण एकवेळ अशी होती की, अपुरी झोप, रात्र-रात्र जागरण, सततची धावपळ, सातत्यानं खणखणारे फोन कॉल्स,प्रचंड अंगदुखी, तापाने फणफणले शरीर.. दिपके यांनी पेनकिलर घेऊन आंदोलन लावून धरलं.