कुणाला फरपटत नेलं, तर कुणी बॅरिकेड्सवर चढलं; दिल्ली जाम केलेल्या CJP आंदोलनाचे अंगावर काटा आणणारे PHOTO आले समोर

Jagdish Patil

मोर्चा

कॉकरोच जनता पार्टीकडून आज संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला.

CJP Parliament Protest | Sarkarnama

दिल्ली पोलीस

या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

CJP Parliament Protest | Sarkarnama

परवानगी

मात्र, आंदोलकांना केवळ केरळ भवनपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

CJP Parliament Protest | Sarkarnama

तणाव

तरीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि तरुण संसद परिसराकडे निघाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

CJP Parliament Protest | Sarkarnama

सहभाग

आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग पाहायला मिळाला.

CJP Parliament Protest | Sarkarnama

जे. पी. नड्डा

दरम्यान, CJP चे प्रवक्ते सौरव दास हे भाजप नेते जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे.

CJP Parliament Protest | Sarkarnama

आंदोलक

यानंतर संसद भवन परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

CJP Parliament Protest | Sarkarnama

नळकांड्या

त्यामुळे परिस्थिती चिघळताच पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.

CJP Parliament Protest | Sarkarnama

फोटो

यावेळी अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून काहींना फरपटत नेल्याचे फोटो समोर आले आहेत.

CJP Parliament Protest | Sarkarnama

बंदोबस्त

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संसद परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

CJP Parliament Protest | Sarkarnama

संसद परिसर

संसद परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस सतर्क असून आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

CJP Parliament Protest | Sarkarnama

NEXT : अभिजित दिपकेवर शाईफेक करणारी महिला कोण? धक्कादायक हिस्ट्री आली समोर...

Barkha Trehan | Abhijeet Dipke | Sarkarnama
क्लिक करा