Pradeep Pendhare
'NCPSP'चे खासदार नीलेश लंके यांनी राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 'एक दिवस महाराजांसाठी, महाराजांच्या गड-किल्ल्यांसाठी' संकल्प केला आहे.
'NCPSP'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार लंकेंच्या संकल्पनेत सहभाग घेत धर्मवीर गडावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
खासदार नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांबरोबर गडावर स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट लावली.
या मोहिमेतून धर्मवीर गडावर स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील करण्यात आली.
जयंत पाटील यांनी खासदार लंकेंच्या उपक्रमाचं अन् मोहिमेत राज्यभरातून सहभागी झालेल्या शिवप्रेमींचं कौतुक केलं.
श्रीरामपूर काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.
धर्मवीर गड हा भीमेच्या काठावर असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानंचं प्रतीक म्हणून ओळखला जातो.
धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी राजांचं मोठं स्मारक व्हावं, अशी शिवप्रेमींची मागणी आहे.