Pradeep Pendhare
राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी मोठी घोषणा केली.
राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल 48 हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी होऊन, त्याच कोऱ्या पाटीवर महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
राज्य सरकारने याआधीच शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवर पंपचे वीज बिलं माफ केले आहे.
पण साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं तशीच आहेत.
अजूनही प्रत्येकाच्या नावाने ती खात्यावर जमा आहेत. यामुळे त्या बिलांची कधीही वसूली होऊ शकते.
शेतकरी पुन्हा वीजेचं कनेक्शन घ्यायला गेले तर त्याला ते मिळत नाही. त्याच्यावर काही बाकी आहे का हे चेक केलं जातं.
नव्याने इतिहास लिहिता यावा म्हणून सरकारने 48 हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.