Pradeep Pendhare
धर्मादाय मंदिरांमधील देणग्यांची सुरक्षा, पारदर्शकता अन् उत्तरदायित्व सुनिश्चितेसाठी मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या राज्य सरकारकडून एसओपी जारी.Temple Donation SOP
प्रमुख मंदिरांमध्ये सीसीटीव्ही अथवा वेब कॅमेरे बसविणे बंधनकारक असून देणगीसाठी क्यूआर कोडद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यात येणार
प्रत्येक हुंडीवर चारही दिशांनी नजर ठेवणारे सीसीटीव्ही किंवा वेब कॅमेरे बसविणे अनिवार्य असून, कॅमेऱ्यांतील चित्रफीत सुरक्षित सर्व्हरवर संग्रहित केली जाणार
मंदिरातील सीसीटीव्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि स्थानिक पोलिस ठाण्यांनाही सीसीटीव्ही प्रणाली जोडली जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात देणगी मिळणाऱ्या मंदिरांमध्ये दर आठवड्याला, तर मध्यम स्वरूपाच्या मंदिरांमध्ये दर पंधरवड्याला दानपेटी मोजणी होणार
सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचे त्याच दिवशी मूल्यांकन करून जिल्हा किंवा उपजिल्हा कोषागारात जमा करणे बंधनकारक असेल.
दान मोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक अधिकाऱ्याला स्वतःकडील रोख रकमेची घोषणा करण्याचे बंधन असणार आहे.
मोजणीदरम्यान चोरी किंवा गैरव्यवहार झाल्यास संबंधित मंदिर अधिकारी आणि तालुकास्तरावरील जबाबदार अधिकाऱ्यांना थेट उत्तरदायी धरले जाईल.
‘अ’ अन् ‘ब’ वर्गातील प्रमुख मंदिरांची जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आयुक्त आणि जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत दर तीन महिन्यांनी संयुक्त तपासणीचे निर्देश.