Vijaykumar Dudhale
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांसाठी बारामती येथे नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा आज आणि उद्या होणार आहे.
बारामती नमो महारोजगार मेळाव्यासाठी नोंदणीकृत उद्योजक 350 सहभागी झाले होते. अधिसूचित रिक्त पदे 55 हजार आहेत, तर उमेदवारांची नोंदणी 33 हजार एवढी झाली आहे.
बारामती बस स्थानक, पोलिस उपमुख्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस वसाहत आदी विकास कामांचे लोकार्पण लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले.
बारामतीत चार एकर जागेवर पूर्वी पोलिसांसाठी 73 क्वॉर्टर होते. आता सात मजली इमारत बांधून 196 क्वॉर्टर उभारले आहेत. त्यासाठी सुमारे 75 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
नमो महारोजगार मेळाव्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे 66 एकर जागेवर 132 कोटी खूर्चन पोलिस उपमुख्यालय करण्यात आले आहे.
बारामतीचे पूर्वीचे बस स्थानक हे पाच एकर दहा गुंठ्यांत होते. पण, त्या जागेत 53 गुंठ्यांची भर घालून महाराष्ट्रातील नंबर एकचे बस स्थानक उभारले आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीतून बारामती पोलिसांना गस्तीसाठी 39 वाहने देण्यात आली आहेत, तीही आज पोलिसांकडे हस्तांरित करण्यात आली
कोकणातील आंगणेवाडी यात्रेला मुख्यमंत्र्यांसह नेत्यांची हजेरी; अनेकांनी केले नवस...