Amol Sutar
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रेला आज सुरुवात झाली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यात्रेला हजेरी लावली. तसेच कोकणातील राजकारण्यांनीही देवीच्या चरणी माथा टेकला.
मुख्यमंत्र्याबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यात्रेत देवीचे दर्शन घेतले.
भराडी देवीच्या दर्शनाला होणारी राजकारण्यांची गर्दी हे आंगणेवाडीच्या यात्रेचे विशेष आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनीदेखील देवीचे दर्शन घेतले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आज आंगणेवाडीत सपत्नीक येऊन भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे देखील उपस्थित होते.
ठाकरे गटाचे खासदार वैभव नाईक यांनी श्री भराडी देवीला राजकीय नवस केला. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, असा नवस त्यांनी केला.
कोकणवासीयांचं आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण मधील आगणेवाडी भराडी देवीची यात्रेत भाजपचे आशिष शेलार यांनी दर्शन घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.