Devendra Fadnavis : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्‌ विरोधी पक्षनेते : सबकुछ देवेंद्र फडणवीस

Vijaykumar Dudhale

बर्लिनमधून व्यावसायिक शिक्षण

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूरमध्ये झाला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पुढे जर्मनीतील बर्लिन येथून व्यवसाय आणि प्रकल्प व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

इंदिरा नावामुळे शाळा बदलली

माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी अटक (आणीबाणीत गंगाधरराव फडणवीस यांना अटक झाली होती) केली, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे देवेंद्र यांनी वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या आईला बजावले. शेवटी त्यांना इंदिरा कॉन्व्हेंटमधून काढून सरस्वती विद्यालयात टाकण्यात आले होते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

वयाच्या अवघ्या २२ वर्षी नगरसेवक

देवेंद्र फडणवीस यांचे वय अवघे १७ वर्षांचे असताना त्यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस यांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवून ते नगरसेवक बनले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

दोन नंबरचे तरुण महापौर

वयाच्या २७ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नागपूर महापालिकेचे महापौर बनले होते. भारतातील ते दोन नंबरचे तरुण महापौर ठरले होते. १९९२ ते २००१ यादरम्यान ते नागपूर महापलिकेत होते. ते दोन वेळा महापौर झाले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

1999 पासून आमदार

देवेंद्र फडणवीस यांनी 1999 मध्ये नागपूर पश्चिम मतदासंघातून आमदारकीची निवडणूक पहिल्यांदा लढवली आणि जिंकलीसुद्धा. तेव्हापासून आजतागायत ते विधानसभेचे सदस्य आहेत.

Devendra Fadnavis | Sarkarnama

रणजित देशमुख यांचा पराभव

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी २००९ मध्ये हॅट्‌ट्रीक केली. त्यांनी २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव केला. फडणवीस हे २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

भाजपने २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजप हायकमांडने दिग्गजांची नावे बाजूला ठेवून नवख्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. ते सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. वयाच्या अवघ्या ४४ वर्षी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

उपमुख्यमंत्री

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळून ही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यावेळी फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेता बनले. एक डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ पर्यंत म्हणजे २ वर्षे २१० दिवस ते विरोधी पक्षनेते होते. मे-जून २०२२मध्ये महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ होऊन राज्यात पुन्हा शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सत्तेवर आली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

महाराष्ट्रात काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार? कोण आहेत 'हे' रणनीतीकार...

Sunil Kanugolu | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा