Rajanand More
तेलंगणा आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात महत्वाचा वाटा. प्रचाराची रणनीती, सोशल मीडिया, स्थानिक मुद्यांना घातला हात.
सुनील कानुगोलू यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने सुनील यांचा लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठीच्या ग्रुपमध्ये समावेश केला होता. पण आता त्यांना यातून वगळण्यात आल्याचे समजते.
महाराष्ट्र व हरयाणामध्ये सात महिन्यांत निवडणुका. दोन्ही राज्यांची रणनीती ठरवण्याची जबाबदारी सुनील यांच्यावर.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत काम. भाजपची सत्ता येण्यात महत्वाची भूमिका.
कर्नाटकातील बल्लारी येथील रहिवासी असलेले सुनील यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण.
प्रशांत किशोर यांची साथ सोडल्यानंतर सुनिल यांनी रणनीतीकार म्हणून स्वतंत्रपणे ओळख निर्माण केली.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी 2018 मध्ये भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणार अमित शाह यांच्यासोबतही सुनिल यांनी काम केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची स्थिती बळकट करण्यासाठी सुनिल यांच्यावर जबाबदारी. काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी आता ते काय रणनीती करणार याकडे लक्ष.