Aslam Shanedivan
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे सोलापूर विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले
पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर त्यांनी तुळजाभवानी मंदीरात जाऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलं
या दर्शनावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेची महाआरती देखील केली
दर्शन आणि महाआरतीनंतर फडणवीस यांनी मंदीरातील जिर्णोद्धार कामाची पाहणी केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते.
तसेच जिर्णोद्धार कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी होत असताना पुरातत्व विभागाचे अधिकारीही उपस्थित होते
दरम्यान तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी दिल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावल्याबद्दल फडणवीस यांचा जिल्हावासीयांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.