Maharashtra Government: जरांगेंच्या आंदोलनाआधीच CM फडणवीसांचा मराठा समाजासाठी 'हा' मोठा निर्णय

Deepak Kulkarni

फडणवीसांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

150 कोटींचा निधी

राज्य सरकारकडून मराठा समाजासाठीच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

अर्थसंकल्पात मोठी तरतूद

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात सरकारकडून पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

आंदोलनाची साद

एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाची साद घातली आहे.

CM Devendra Fadnavis Maratha Commnuity | Sarkarnama

चर्चांना उधाण

मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलनानं वातावरण तापण्याआधीच सरकारनं हा निधी दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

CM Devendra Fadnavis Maratha Commnuity | Sarkarnama

अनेक योजना

मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अनेक योजना राबवत असते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांसाठी हे महामंडळ आर्थिक आधार बनलं आहे.

CM Devendra Fadnavis Maratha Commnuity | Sarkarnama

निधीचं वर्गीकरणही

महायुती सरकारनं सुरू असलेल्या 2025-26 या आर्थिक वर्षात 750 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असून 300 कोटींच्या निधीचं वर्गीकरणही करण्यात आला आहे.

CM Devendra Fadnavis Maratha Commnuity | Sarkarnama

एक महत्त्वाचे महामंडळ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे महामंडळ आहे.

CM Devendra Fadnavis Maratha Commnuity | Sarkarnama

हेतू

या महामंडळाचा हेतू हा मराठा समाजातील तरुणांना व्यवसायात भरारी घेण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. महामंडळामार्फत वैयक्तिक व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंत आणि गटप्रकल्पासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

CM Devendra Fadnavis Maratha Commnuity | Sarkarnama

NEXT: कॉकरोच जनता पार्टीचा 2029 साठी 'फाईव्ह पॉईंट' अजेंडा कोणता? वाचा सविस्तर...

Cockroach-Janta-Party.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा....