Pradeep Pendhare
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल, 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळाजवळ एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यांसारखे प्रकल्प उभारले जाणार.
महाराष्ट्राने सातत्याने 10 टक्क्यांहून अधिक विकासदर राखला असून, ही गती राहिल्यास 2030 पर्यंतच महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल.
एसबीजी ग्रुपने मुंबई, मुंबई महानगर इथं लॉजिस्टिक्समध्ये 20 बिलीयन डॉलर्सची गुंतवणूक करत असून, यातून 4 लाख 50 हजार रोजगार निर्माण होईल.
सूरजागड इस्पात लिमिटेडने स्टील क्षेत्रात गडचिरोलीत 20 हजार कोटींची गुंतवणूक करताना, यातून आठ हजार रोजगार निर्मितीची शक्यता आहे.
पालघर आणि मुंबई महानगर इथं बीएफएन फोर्जिंग्ज स्टील उद्योगासाठी ५६५ कोटींच्या गुंतवणुकीतून 847 रोजगार निर्माण होईल.
योकी ग्रीन एनर्जी लिमिटेड पुनर्वापराची ऊर्जेवर पालघर आणि मुंबई महानगरमध्ये चार हजार कोटीची गुंतवणूक करताना, त्यातून सहा हजार रोजगाराची शक्यता आहे.
सुमिटोमो रिअॅलिटी अँड डेव्हल्पमेंट, के. रहेजा कॉर्पोरेशन, अल्टा कॅपिटल/पंचशील रिअॅलिटी, आयआयएएम ग्लोबल यां कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
राज्यात सध्या, तिसरी मुंबई उभी राहत असून, या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.