Mangesh Mahale
काशी हे केवळ एक शहर नाही, तर तो हिंदू संस्कृतीचा श्वास, अध्यात्माचा गाभा आणि मोक्षाची संकल्पना आहे.
काशीतील मणिकर्णिका घाट पुन्हा कुतूहलाचा केंद्रबिंदू ठरला आहे. घाटाशी जोडलेलं एक रहस्य अनेकांना विचार करायला लावते.
‘काश्यां हि काशते काशी’ असे सांगणारी ही नगरी हजारो वर्षांपासून अखंड श्रद्धेवर उभी आहे.
रात्रंदिवस पेटलेली चिता, धुराचा वास, मंत्रोच्चारांचा आवाज आणि शांततेत दडलेली एक वेगळीच भीती येथे वाटते.
हिंदू धर्मानुसार इथे अंत्यसंस्कार केल्यास थेट मोक्ष मिळतो, म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक याठिकाणी येतात.
अनेक मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यापूर्वी पांढऱ्या रंगात ‘94’ हा अंक लिहिलेला असतो. याचं मृत्यूशी काय कारण?
मान्यतेनुसार प्रत्येक मनुष्यात 94 गुण (मुक्ती मंत्र) असतात. हे गुण त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार वाढतात किंवा घटतात.
अंतिम संस्कार करताना हे 94 गुण शरीरास समर्पित केले जातात, त्यामुळे आत्म्याला मुक्ती आणि मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.