सरकारनामा ब्यूरो
2024 विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा मिळवत घवघीत यश मिळवले. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
त्यांचा अध्यक्ष ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास कसा सुरु झाला जाणून घेऊयात...
देवेंद्र फडणवीस यांनी कायदा त्यानंतर बिझनेस मॅनेजमेटमध्ये पदवी मिळवली. तर महाविद्यालयात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत महत्वाची भूमिका बजावली.
ते 1989 ला नागपूरचे भाजप वार्ड अध्यक्ष बनले होते. त्यानंतर 1992 ला ते नागपूरचे नगररसेवक बनले.
वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांना 1997 मध्ये नागपूरचे महापौर बनण्याचा मान मिळाला.
1999 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत ते पहिल्यांदा निवडून आले होते. 2010 मध्ये त्यांची निव़ड भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली. याच काळात भारताचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले.
2013 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राज्यभरात पक्षबांधणी केली.
2014 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि हा शपथविधी संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. 'मी पुन्हा येईन' हे फडणवीस याचं वाक्य त्यावेळी खूप प्रसिध्द झालं होतं.
2019 च्या निवडणुकीत भाजपाचे सर्वात जास्त आमदार विजयी झाले