सरकारनामा ब्यूरो
सुखबीर सिंह बादल हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत.
सुवर्ण मंदिराच्या बाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते थोडक्यात बचावले.
गुरू ग्रंथ साहिबचा अपमान केलेल्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा आरोपी आहे. त्याची बाजू सुखबीर सिंह यांनी घेतल्याने त्यांना शिक्षा सुनावली आहे.
सुखबीर सिंह यांच्याबरेबरचं 17 जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात 2015 मध्ये अकाली सरकारचे काही कॅबिनेट मंत्री देखील आहेत.
ते सुवर्णमंदिर परिसरात पहारा देत होते. त्यावेळी त्यांच्यावर नारायण सिंह याने हल्ला केला.
हल्लेखोराने पिस्तूल रोखताच बादल यांच्या भोवती तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेराव घातला. पोलिसांना काही हल्लेखोरांना पकडण्यात यश आहे.
शिरोमणी अकाली दलातील एडीसीपी हरपाल सिंह यांनी पोलिसांनी व्यवस्थित सुरक्षा न दिल्याने हा हल्ला झाल्याचा आरोप केला आहे.
त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याकडून फखर-ए-कौम हा सन्मान काढून घेण्यात आला आहे.