Devendra Fadnavis: CM देवेंद्र फडणवीसांना कोणती गाणी आवडतात? 'हे' आहे सर्वात फेव्हरेट

Deepak Kulkarni

मुत्सद्दी, चाणाक्ष राजकारणी

देवेंद्र फडणवीस हे एक मुत्सद्दी, चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र भाजपचा ते प्रमुख चेहरा आहे.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी

देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांचे महाराष्ट्राइतकीच दिल्ली दरबारी वजन आहे.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

रेडिओ जॉकींनी घेतली मुलाखत

मुख्यमंत्री फडणवीसांची 5 रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. यावेळी मुलाखतीत त्यांनी आपल्या तारूण्यातील अनेक किस्से सांगितले. 

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

लिहिलेल्या कविता आणि गाणी

या मुलाखतीत त्यांनी महाविद्यालयात शिकत असताना मॉडेल म्हणून केलेलं काम, रचलेल्या कविता आणि लिहिलेल्या गाणींविषयीची माहिती दिली.

Devendra Fadnavis .jpg | Sarkarnama

मॉडेल म्हणूनही काम

विशेष बाब म्हणजे फडणवीसांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मॉडेल म्हणूनही काम केल्याचं त्यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis | Sarkarnama

मित्रांचा माझ्यासोबत प्रँक

पण मॉडेलिंग करणं हा एक अपघात होता. तो मित्रांनी माझ्यासोबत केलेला प्रँक होता,अशी गमतीशीर आठवणही त्यांनी सांगितली.

Devendra Fadnavis .jpg | Sarkarnama

कविता, दोन गाणे

कॉलेजमध्ये असताना कविता लिहिल्या होत्या. तसेच नुकतेच दोन गाणे लिहिल्याचंही त्यांनी म्हटलं. यातलं एक गाणं राम,तर दुसरंं शंकरावर आहे, असंही फडणवीस म्हणाले.

CM-Devendra-Fadnavis | Sarkarnama

प्रेमविवाह नाही तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी अमृता फडणवीसांसोबत प्रेमविवाह नाही तर अरेंज मॅरेज केल्याचं सांगितलं.

Devendra-Fadnavis Amruta Fadnavis | Sarkarnama

फडणवीसांचं आवडतं गाणं...

तसेच आपल्याला नाईन्टीजची गाणी खूप आवडत असल्याची कबुलीही दिली. त्यांनी हिंदी सिनेमातील आपलं आवडतं गाणं सांगताना फडणवीसांनी अजय देवगण आणि तब्बू यांच्या सिनेमातील ज्या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी म्हटल्या. ते होतं...“राहो उनसे मुलाकात हो गई…”.

Devendra-Fadnavis | Sarkarnama

NEXT : वाहनधारकांसाठी गुड न्यूज! HSRP बसवण्याची मुदत पुन्हा वाढली; जाणून घ्या नवी डेडलाईन!

HSRP-Number-Plate.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा....