Rashmi Mane
HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदतीत वाढ झाली आहे. वाहनचालकांनी 'ही' महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं!
HSRP म्हणजे High Security Registration Plate. गाडीच्या नंबर प्लेटला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सर्व वाहनांवर अनिवार्य करण्यात आले आहे.
आधीची अंतिम मुदत होती 30 जून 2025 पण प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे सरकारने मुदत वाढवली.
नवीन अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 हीच अंतिम संधी आहे! यानंतर मुदत वाढवली जाणार नाही.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली सर्व वाहने. जुन्या गाड्यांना देखील आता HSRP लावणं बंधनकारक.
अधिकृत वेबसाईटवर जा: transport.maharashtra.gov.in आणि नोंदणी करा. 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट घ्या आणि नंबर प्लेट बसवा.
15/08/2025 नंतर जर HSRP नसेल तर वायुवेग पथकाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे. दंड आणि इतर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं.
अपॉइंटमेंट घेतलेली असेल आणि तारीख उशिराची असेल तर कोणतीही कारवाई होणार नाही सरकारने स्पष्ट केलं आहे.