Devendra Fadnavis : फडणवीसांनी गडचिरोलीचा दौरा गाजवला; काय घडलं? पाहा खास फोटो...

Rajanand More

जनजागरण मेळावा

नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये घालवला. जनजागरण मेळाव्यामध्ये लाडक्या बहिणीने पारंपरिक टोप घालत स्वागत केले. 

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

तारक्काचे आत्मसमर्पण

फडणवीस यांच्यासमोर 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये जहाल नक्षलवादी तारक्का सिदामचाही समावेश आहे.  

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

विकासकामांची पाहणी

देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील गट्टा-गर्देवाडा-तोडगट्टा-वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाची पाहणी केली.

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

विकासकामांचे लोकार्पण

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर तयार झालेला आणि 20 पेक्षा अधिक दुर्गम गावांना जोडणारा 32.67 किमीचा रस्ता आणि ताडगुडा पुलाचे लोकार्पण केले. या दुर्गम भागाला भेट देणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री.

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

बससेवा सुरू

महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जाण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या अहेरी-गर्देवाडा बससेवेचा फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

विद्यार्थ्यांशी संवाद

मुख्यमंत्री फडणवीस यांचा गडचिरोलीमधील शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

पोलिसांना वाहनांचे वितरण

फडणवीस  यांच्या हस्ते गडचिरोली पोलिस दलाला 5 बस, 14 चारचाकी मोटारी, 30 मोटारसायकलींचे ‍वितरण करण्यात आले.

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

लाडक्या बहिणींचे अनुभव

संसाराचा गाडा हाकताना 'माझी लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून मिळालेल्या रकमेची कशाप्रकारे मदत झाली, हे मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून जाणून घेतले.

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

विविध प्रकल्पांचे उद्घाटन

फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली स्थित कोनसरी येथे लॉईड मेटल कंपनीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन झाले.

Devendra Fadnavis in Gadchiroli | Sarkarnama

NEXT : देशातील सर्वात श्रीमंत CM चंद्रबाबू नायडू यांचे शिक्षण किती?

येथे क्लिक केले.