सरकारनामा ब्यूरो
एडीआर (एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स) च्या रिपोर्टनुसार भारतातील 31 मुख्यमंत्री आहेत. ज्यांची संपत्ती कोटीच्या घरात आहे.
आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू हे एडीआर रिपोर्टनुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्याच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रंमाकावर येतात.
एडीआर एडीआर रिपोर्टनुसार नायडूंची एकूण संपत्ती 931 कोटी इतकी आहे.
श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच शिक्षण किती आहे आणि कोठून पूर्ण केलं. हे जाणून घेऊयात...
चंद्राबाबू यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील नरवरिपल्ली या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. येथेच त्यांनी त्यांच बालपण गेलं.
चंद्राबाबूंनी त्यांच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावातून पूर्ण केलं. वेंकटेश्वर या कॅालेजातून त्यांनी बी.ए ची डिग्री घेतली.
बी.ए ची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र विषयात मास्टरची पदवी मिळवली.
वेंकटेश्वर काॅलेजमधून चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या राजकीय करियरला सुरुवात केली