Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने घेतले 'हे' 7 मोठे निर्णय

सरकारनामा ब्यूरो

मंत्रिमंडळाची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.25) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मंत्रिमंडळात 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते कोणते जाणून घेऊयात.

Cabinet Meeting | sarkarnama

कनिष्ठ न्यायालयाच्या स्थापनेस मंजुरी

मुळशी जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे.

Cabinet Meeting | sarkarnama

वित्त विभाग

ठाण्यामध्ये जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Cabinet Meeting | sarkarnama

मदत व पुनर्वसन विभाग

महाराष्ट्रात 332 पुनर्वसित गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.

Cabinet Meeting | sarkarnama

नियोजन विभाग

महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणांना मान्यता देत राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समितीची स्थापना केली जाणार.

Cabinet Meeting | sarkarnama

कृषि व पशुसंवर्धन विभाग

बारामती येथील पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली असून यासाठी 564.57 कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

Cabinet Meeting | sarkarnama

कृषि व पशुसंवर्धन विभाग

परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी 564.57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Cabinet Meeting | sarkarnama

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18 (3) 1955 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता देण्यात आली आहे.

Cabinet Meeting | sarkarnama

NEXT : पोलिस निरीक्षकाच्या अरेरावीमुळे त्यांचं मन दुखावलं अन्..! आता IPS होत दाखवून दिली ताकद...

येथे क्लिक करा...