IPS Siddharth Srivastava : पोलिस निरीक्षकाच्या अरेरावीमुळे त्यांचं मन दुखावलं अन्..! आता IPS होत दाखवून दिली ताकद...

सरकारनामा ब्यूरो

कठोर परिश्रम

IAS, IPS होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. पण त्यासोबतच प्रोत्साहन आणि काही तरी करून दाखवण्याची जिद्दही अंगी असावी लागते. अशाच जिद्दीने पेटलेल्या IPS सिध्दार्थ श्रीवास्तव यांचा हा प्रवास...

Siddharth Shrivastav | sarkarnama

सिद्धार्थ श्रीवास्तव

वाराणसी येथील राहणारे सिद्धार्थ यांनी त्यांचे ग्रॅज्युएशन बनारस विद्यापीठातून येथून पूर्ण केले आहे. 2013 ला जेईईची परीक्षा पास करत त्यांनी आयआयटी बीएचयू येथून बीटेक ची डिग्री मिळवली.

Siddharth Shrivastav | sarkarnama

नोकरी

2017 मध्ये मारुती कंपनीमध्ये रुजू होत त्यांनी पुढे अनेक वर्ष इथेच नोकरी केली. नोकरी करत असताना त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

Siddharth Shrivastav | sarkarnama

नायब तहसीलदार

2018 ला त्यांनी UPPSC ची परीक्षा दिली आणि ही परीक्षा उत्तीर्ण करत ते उत्पादन शुल्क निरीक्षक तर, 2020 ला नायब तहसीलदार बनले.

Siddharth Shrivastav | sarkarnama

IPS अधिकारी बनण्याचा निश्चय

लखनऊ येथे नायब तहसीलदार म्हणून काम करत असताना एका पोलिस निरीक्षकाने त्यांच्यासोबत अरेरावी केली होती. या घटनेने त्यांना IPS साठी प्रवृत्त केले. तेव्हापासून त्यांनी IPS होण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यास सुरूवात केली.

Siddharth Shrivastav | sarkarnama

अपयश

UPSC परीक्षेची तयारी सुरु करत सिद्धार्थ यांनी तब्बल पाच वेळा परीक्षा दिली. पण पाचही वेळेला त्यांना अपयश आले तरीही, त्यांनी परीक्षेची तयारी सुरुच ठेवली.

Siddharth Shrivastav | sarkarnama

स्वप्नपूर्ती

2023 ला शेवटच्या अटेम्प्टमध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत 6 वा रँक मिळवला. आणि सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Siddharth Shrivastav | sarkarnama

NEXT : वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका करणं 'कलेक्टर ब्रो'ला भोवलं; थेट निलंबन, कोण आहेत हे प्रसिध्द IAS?

येथे क्लिक करा...