Pradeep Pendhare
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी कृती अभियानाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेताच, 48 विभागांना लोकहिताचा योजना, उपक्रमांची अंमलबजावणीचा आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिला होता.
यासाठी 938 मुद्दे घोषित करण्यात आले होते. त्यापैकी 44 टक्के म्हणजेच, 411 मुद्यांवर विभागांकडून कार्यवाही पूर्ण झाली.
150 मुद्यांवर कार्यवाहीच झाली नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
सांस्कृतिक कार्य, जलसपदा, कामगार, महिती तंत्रज्ञान, ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य हे सहा विभाग कामगिरीत सरस ठरले.
महिला आणि बालविकास, नगर विकास, पाणीपुरवठा, शालेय शिक्षण, वने, बंदरे यासह 22 विभाग जेमतेम 35 टक्के उद्दिष्टांपर्यंत पोचले.
महसूल, गृह, ऊर्जा, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, कौशल्य विकास, आदिवासी विकास रोजगार हमी आणि मराठी भाषा विभागांनी 50 टक्के उद्दिष्टपूर्ण केलं आहे.
गृहनिर्माण, मदत व पुनवर्सन, उच्च व तंत्रशिक्षण, सामान्य प्रशासन (सेवा), सामाजिक न्याय, सहकार, पर्यटन, वैद्यकीय शिक्षण विभागांनी जेमतेम 36 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विभागांना कामगिरीत सुधारणा करण्यासाठी 15 दिवसांचा मुदतवाढ दिली आहे.