Mayur Ratnaparkhe
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट झाली.
राज ठाकरेंनी फडणवीसांच्याखांद्यांवर नारंगी रंगाची शाल टाकून त्यांचे स्वागत केले.
फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंसोबत त्यांची ही पहिलीच भेट होती.
लाल गुलाबांचा भला मोठा पुष्पगुच्छ राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला.
या भेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या अन् अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.
या भेटीप्रसंगी मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांचीही उपस्थिती होती.
राज ठाकरे यांनी अतिशय आनंदाने मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वागत केले.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.