Jagdish Patil
CM देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत.
20 ते 24 जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
तर CM फडणवीस यांनी एक्सवर दावोसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ही परिषद महाराष्ट्राच्या वाटचालीतील हा एक अतुलनीय टप्पा असल्याचं म्हटलं आहे.
या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रात 15 लाख 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 61 सामंजस्य करार करण्यात आलेत.
यामुळे राज्यात 16 लाख रोजगारांची निर्मिती होणार असून ही विक्रमी गुंतवणूक भारत आणि महाराष्ट्राची ताकद वाढल्याची द्योतक असल्याचं CM म्हणाले.
या दौर्यात राज्यातील सर्व क्षेत्रात गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही CM फडणवीसांनी सांगितलं.
यावेळी स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी तसेच मोठमोठ्या उद्योजकांनी उत्साहाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.